माझा परिचय…

 

सौ.भारती श्रीनिवास शुक्ल

मी सौ.भारती श्रीनिवास शुक्ल.
वास्तव्य नाशिक. भूगोल विषयात एम .ए .एम.फिल.बी.एड असून शिक्षण नागपूर येथून पूर्ण केले. नाशिक च्या भोसला सैनिकी महाविद्यालयात गेल्या 29 वर्षांपासून लेक्चरर म्हणून कार्यरत आहे.

लहानपणापासून काव्यलेखन, वाचन, संगीत ऐकणे, गायन. पेन्टिंग,नृत्य, रांगोळी, अश्या सगळ्या कलांमध्ये माझा ओढा असून या सर्व छंद जोपासण्यात एक प्रकारची चैतन्यऊर्जा, सकारात्मकता, सर्जनशीलता,संवेदनशीलता ,प्रगल्भता मिळत आलेली आहे. प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य शोधण्याची दृष्टी, लेखन करताना निरीक्षण क्षमता, विचार क्षमता वाढण्यासाठी हे सगळे छंद मला नेहमीच उपयोगी पडले आहेत. हे सर्व छंद जोपासताना मिळणारा स्वनिर्मितीचा आनंद हा आपल्या निरामय उत्साही आयुष्यासाठी खुप महत्वाचा असतो असे मला मनापासून वाटते .

निसर्ग प्रेमी असल्याने पर्यटन, बागकाम, फोटोग्राफी पुष्प सजावट हे सुध्दा आवडते छंद आहेत जे जगण्याचा आनंद सोहळा करत असतात. माझ्या सगळ्या कवितांना, चित्र चारोळ्यांना, पेन्टिंग्जना माझ्याकुटुंबियांनी, मित्रमैत्रिणींनी आप्तस्वकीय रसिकांनी नेहमीच आपले कौतुकाचे अभिप्राय देऊन मला प्रोत्साहन दिले आहे. आजच्या डिजीटल युगात माझे काव्यलेखन हे सातासमुद्रापार असलेल्या रसिक वाचकांपर्यत पोहोचविण्याची संधी मला सदर वेबसाईट द्वारा मिळत आहे याचा मनस्वी खुपच आनंद होत आहे . अर्थातच याचे श्रेय माझे यजमान श्री. श्रीनिवास शुक्ल यांनांच जाते .

त्यांनीच सदर चित्र काव्य रचनांना संकलीत करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. दररोज सातत्याने लिहिलेल्या माझ्या चित्रचारोळ्यांना,कवितांचा आस्वाद घेऊन आपण सर्वांनी आवडल्यास लाईक करा तसेच आपला अभिप्राय, सूचना कृपया खाली दिलेल्या कंमेट बाक्स मध्ये कृपया कळवावा. ही नम्र विनंती.

धन्यवाद !!

 

email id