1. आराधना
मुर्तीमंत तुझे रुप तेजस्वी
बुद्धी देवता तू गजानना
मनोभावे पूजन करीते
हात जोडूनी आराधना
चंदनाचे अष्ट्गंध मी
जसे सजविले तुझ्या च भाळी
शुद्ध, शितल पावनता
माझ्या मनात तशी वसावी
सम ईची जशी स्थिर ज्योती
मनस्थिरता मज तशी लाभावी
तेजोवलयाच्या प्रकाशातुनी
द्दष्टीपथा ची सजगता उजळावी
देव्हाऱ्यात तुझ्या चरणांवरती
रंगपंचमी गंध फुलांची
रंग जरी मज नाही दिले तरी
संवेदनशीलता फुलांपरी मिळावी
प्रज्वलित या धुपदिपा परी
अस्तित्वाची दरवळ असावी
नैवेद्यातील स्वादरसापरी
सात्त्विकता मनी स्त्रवावी
कर्णमधुर या शंखनादापरी
विनयशीलता मुखी झरावी
मांगल्याची परिमलता
व्यक्तीत्वातून जाणवावी
प्रेम, माया जिव्हाळ्याची
नीरांजने मनी तेवावी
माणुसकी ची जाणीव
माझ्या ह्दयात फुलावी
सकलजनां चा तू विधाता
तिन्ही जगाचा तू अंतर्यामी
वरदहस्त तुझा सदा असावा
तुझ्या चरणी नतमस्तक मी
2. दीप सोहळा
आला आनंदोत्सव दिपावली सण
सूर मांगल्याचे वाहे मंतरले क्षण
पायघड्यांनी पुष्पपाकळ्यांच्या
सजवू अंगण सजवू चौथरा
रंग रेषेच्या नाजूक कलाकुसरीने
खुलवुं प्रागंण नटवू उबंरा
नक्षीदार लक्ष दिपकळंयानी
उजळवू घराचा प्रत्येक कोपरा
आकाश दिव्याचे चढवू झुबंर
प्रकाश पाजळवू अवनी अंबर
आम्रपल्लव झेंडूची करून गुंफण
शुभशकूनाचे दारी बांधु तोरण
दगडी सुबक काळ्या पायदंडींवर
रांगोळी शुभचिन्हांची रेखू सुंदर
सजवून तेजोमय तुळशी वृंदावन
सहकुटुंब करूया लक्ष्मी पूजन
पेटवून अंतरी स्नेहाच्या ज्योती
जपूया नात्यांच्या रेशिमगाठी
पाहूनी स्वागत सोहळा हा साजरा
रेंगाळेल सुख समृद्धी अनंत प्रहरा
सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक.
3. चंद्रोत्सव
ऋतूचक्रातील मधुमास चैत्र
पंचसंवेदनाने फुलवी गात्रं
जागवी उत्कटता चैत्र अवतरण
स्वर्गीय मोहराचे जरतारी दालन…..
नव्हाळी, डहाळीस देऊन निमंत्रण
चैतन्य रसाची पोपटी शिंपण
फाल्गुनी ज्या होत्या खुडल्या
पर्णोपर्णी उमले कांचनकळ्या…..
मोगरा बकुळ, सोनचाफ्याची भूल
राघूंच्या थव्यांची मधूर शीळ
ऊन्ह कवडस्यांचा खेळ वेल्हाळ
सृष्टीच्या रोमरोमात सळसळ …
आम्रमंजिरीनीं गंधाळला वारा
कोकिळ स्वर भेदे आसमंत सारा
रंग संमेलनाची स्वागतयात्रा
लावण्य सोहळ्याची वर्षप्रतिपदा….
प्रभूरामाचे अयोध्यी आगमन
कनकस्पर्शाने ज्याच्या सृष्टी पावन
विजयगुढी उभारून वंदियले चरण
परंपरेने साजरा होई मंगलक्षण…
उज्ज्वल भवितव्याची करून प्रार्थना
निश्चय करू एक गुढी उभारताना
सकारात्मक उर्जेचे घेऊन बळ
संपवू विषाणु विघ्नास समूळ…..
सुसंवाद रूपाने जपूया मैत्री
नववर्षात गाठीभेटींची नांदी
सावरू नात्यांना देवूनी विश्वास
बहरेल सहवासाचा पुन्हा मधुमास .
सौ भारती श्रीनिवास शुक्ल.
नाशिक.
4. चैत्र पाडवा
ऋतूचक्रातील मधुमास चैत्र
पंचसंवेदनाने फुलवी गात्रं
जागवी उत्कटता चैत्र अवतरण
स्वर्गीय मोहराचे जरतारी दालन…..
नव्हाळी, डहाळीस देऊन निमंत्रण
चैतन्य रसाची पोपटी शिंपण
फाल्गुनी ज्या होत्या खुडल्या
पर्णोपर्णी उमले कांचनकळ्या…..
मोगरा बकुळ, सोनचाफ्याची भूल
राघूंच्या थव्यांची मधूर शीळ
ऊन्ह कवडस्यांचा खेळ वेल्हाळ
सृष्टीच्या रोमरोमात सळसळ …
आम्रमंजिरीनीं गंधाळला वारा
कोकिळ स्वर भेदे आसमंत सारा
रंग संमेलनाची स्वागतयात्रा
लावण्य सोहळ्याची वर्षप्रतिपदा….
प्रभूरामाचे अयोध्यी आगमन
कनकस्पर्शाने ज्याच्या सृष्टी पावन
विजयगुढी उभारून वंदियले चरण
परंपरेने साजरा होई मंगलक्षण…
उज्ज्वल भवितव्याची करून प्रार्थना
निश्चय करू एक गुढी उभारताना
सकारात्मक उर्जेचे घेऊन बळ
संपवू विषाणु विघ्नास समूळ…..
सुसंवाद रूपाने जपूया मैत्री
नववर्षात गाठीभेटींची नांदी
सावरू नात्यांना देवूनी विश्वास
बहरेल सहवासाचा पुन्हा मधुमास .
सौ भारती श्रीनिवास शुक्ल.
नाशिक.
5. ऋतूरंग
इन्द्रधनूचे रंग उधळूनी
असा देखणा निसर्ग नटला
सहा ॠतुंची वस्त्रे लेवूनी
प्रहरापरी नवा सजला..
रंग तुझा सोनसळी
घेऊन येशी रामप्रहरी
संध्या समयी भासे गहिरा
जणू शेला गडद केशरी…
कधी पाचूंचे कधी पोपटी
रान सारे बहरलेले
पिवळी शेते उभी डोलती
झरे वाहती नितळ निळे
भरून आल्या आभाळापरी
कधी रंग हे दाटलेले
कधी बरसता मेघ अचानक
होती गहिरे रंग ओले
कधी हलके ,कधी उदास
रंग कधी हिरमुसलेले
लख्ख टिपूर चांदण्यापरी
कधी रूपेरी शुभ्र खुले …
सांग तुझ्या क्षणोक्षणी
छटा कश्या बदलती
रंग जरी तेच तुझे
रूप नवे का भासती
तुझ्या रंग कुंचल्याची
रंगविभोर अदाकारी
किती छटा ,किती रूपे
नयनरम्य जादूगरी..
शतरंगांनी सजलेली
रंगमंच जणू सृष्टी सारी
ईश्वराच्या कल्पकतेची
रंगवेडी किमया भारी..
सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक
6. स्वरांजली
संथ वाहत्या गोदाईच्या
गर्द कातळ काठावरती
नारोशंकराच्या पायथ्याशी
ऐतिहासिक घाटावरती
केशर शिंपीत सूर किरणांची
मैफिल सजली पहाट वेळी
शुद्धस्वरांची होता उधळण
भक्ती रसाने मंतरले क्षण
संस्कृतीचा सूरेल नजराणा
परमेश्वर चरणी झाला अर्पित
लक्ष दिव्यांनी उजळून गेला
मंदिराचा गाभा पुलकित
काळ्याशांर दगडांवरती
नक्षीकामाची रंगली नजाकत
रंगबावर्या विविध फुलांची
मोहक देखणी अशी सजावट
कोरलेल्या कमानींवरती
रोषणाईची आभा पसरली
सभा मंडपी खांबावरती
पुष्पमालांची आरास झुलली
लुटला खजिना सप्तसूरांचा
सूराविष्काराने गगन भारले
ऐकून अनोखी ख्याल गायकी
रसिक श्रोते तृप्त जाहले
स्वरचांदण्याचा कलश सांडता
काठ गोदेचा अवघा थरथरला
एक अनामिक सुगंध स्पर्शून
रोमांचित हा परीसर झाला
अलगद फुलता हरएक बंदिश
जललहरींवर तरंग उठले
मिटले डोळे सकळ जनांनी
ईश्वर चरणी लीन झाले
स्वरसुमनांची भरता ओजंळ
रिती जाहली सूर प्रार्थना
राग भैरवी सादर करता
शिवशंकराची झाली अर्चना
हरीहर भेटीचा योग साधला
‘सकाळ अनुनाद’ उपक्रम आगळा
नाशिक नगरीचा मान पहिला
संस्मरणीय ठरला असा सोहळा
सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक
7. चेन्न केशव मंदिर
शिल्पकलेचे अतुलनीय हे वैभव
मंदिर कर्नाटकतील चेन्न केशव
वास्तुशिल्पाचा अदभुत नजराणा
कलाकुसरीचा नेत्रदीपक खजिना
बाराव्या शतकातील श्रीविष्णु मंदिर
किनारी ‘यागची’ च्या शहर बेलूर
स्थापत्य शास्त्राचा देखणा नमुना
उजळे ऐतिहासिक खाणाखुणा
निर्मितीस अविरत शतक अवधी
नटल्या कलाकृतींनी मंदिर भिंती
देवदेवितांच्या प्रतिमा अनेक सुंदर
महाभारत,चित्रदर्शन किती मनोहर
नवरंगी सभामंडप चौरसाकार
भव्यदिव्य मंदिरास तिन प्रवेशद्वार
स्तंभांवरती नक्षीकाम अलौकिक
फिटे पारणे डोळ्यांचे पाहूनी वैभव
रेखीयल्या शिलेवरती बहूनृत्यागंना
अभिसारिका, विष्णूमोहिनी ललना
अर्धोन्मीलित कमळ घुमट सजला
दगडी नाजूक जाळ्या दहा दिशेला
पाषाण काळे रेखीवकामाने कोरीले
रूंद चौथरे द्रविड शैलीने रचिले
गजप्रतिमेने सजल्या या शिल्पकृती
गर्भगृह रूप पाहून नयन विस्फरती
वाद्यं वादके देखणी सूरसुंदरी रती
दागदागिने, तरल केशरचना कृती
शेषशय्यी रंगनाथ विष्णू पहूडलेला
नजर ठरेना स्थिर पाहून दिव्यकला
अचंबित विश्व अशी कलेची श्रीमंती
बहूमिळाली मंदिरास ख्याती जगती
अविरत चाले विष्णूपुजा साग्रसंगीत
असे वारसा निर्मितीते आजतागायत
सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक.
8. गोदाकाठ
दिर्घ मोकळा श्वास घेतला
पुन्हा एकदा या गोदेनी
तेच अवखळ रूप गोजिरे
युगा युगानी आले फिरूनी
पूरव क्षितिजी,गगन मचंकी
भरला मळवट दशदिशानी
नितळ जळावर या गोदेच्या
किरण शलाकी रंगपंचमी
निर्जन काठी पाण्यावरती
अलगद रोमांचित वलये उठती
सोनसळी मासोळ्याअंची
कातळतीरावर लगबग दिसती
स्वच्छ मोकळे घाट शोभती
पाषाण काळे तेज तळपती
पावनतेची करून शिपंण
निसर्गदेवतेचे स्वागत करिती
स्तब्ध थांबल्या काठावरती
वृक्ष वल्लरी पुन्हा डवरती
पक्षी मनोहर पंख पसरूनी
दोन्ही तिरावरी मुक्त विहरती
शुभ्र हसर्या तारकांचे
प्रतिबिंब जलावर दूर पसरले
किती युगानी पुन्हा एकदा
शरद चादंणे दर्पणात हसले
रूप यौवना कुणी कामिनी
लक्ष हिर्यानी जशी मढविली
तशीच मुरकत गोदा चचंल
वळणावरती जणु थिरकली
आज पुन्हा जलदेवता ही
सौंदर्याने बहरून गेली
मागंल्याची करून उधळण
नखशिखांत शृंगारून सजली
दिर्घ मोकळा श्वास घेतला
पुन्हा एकदा या गोदेनी
असेच ठेवू स्वच्छ निरंतर
पात्र गोदेचे प्रदुषण विरहित
जपूया आपूली जिवन सरिता
उद्याच्या उज्ज्वल भविष्या करिता
सौ.भारती श्री निवास शुक्ल
नाशिक.
9. प्राजक्त
रंग बावर्या श्रावणमासी
उत्तर रात्रीच्या होवून साक्षी
अंगणी माझीया विखुरली
शुभ्र शुचित प्राजक्ता नक्षी
इवलेसे मोहक रूप तयांचे
पानीपानी असे बहरले
नक्षत्रापरी भासे सुंदर
नाजूक कोमल पाकळ्यात हसले
झोकाळून देता अंग आपुले
फांदी मोहरुन अशी भारली
सुगंध झिरपता देठ पोवळी
समीर स्पर्शाने थरथरली
शितवायुच्या लहरींवरती
गंध तयांचा असा पसरला
जागवूनी सृष्टीची स्पंदने
दशदिशांच्या गात्रातच भिनला
ओजंळीत फुले अलगद टिपता
अवघा भरला श्र्वास अंतरी
देव्हार्यातील मुरलीधराच्या
पुरती वाहिली चरणावंरती
क्षणभंगुर हे तयांचे जिवन
अस्तित्वच जणु कृष्णार्पण होण्या
निरव शांतता मागे ठेवून
उरल्या केवळ गंधखुणा
सौ.भारती श्रीनिवास शुक्ल.
नाशिक.
10. मोगरा फुलला